आपला समुद्र किनारा आपली जबाबदारी' अमित ठाकरे यांनी स्वच्छ केला दादर समुद्र किनारा.

आपला समुद्र किनारा आपली जबाबदारी' अमित ठाकरे यांनी स्वच्छ केला दादर समुद्र किनारा.

प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
अनेक पर्यावरणप्रेमींसह श्री. अमितजी ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
 याप्रसंगी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष श्री. जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. 
आज शनिवार सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले. 

Post a Comment

Previous Post Next Post