आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात 

प्रतिनिधी : बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात…

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.
पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजाला 28 सप्टेंबरपासून प्रारंभ
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण

पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या 

सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा 

वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश

औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार

राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरणार

आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता


Post a Comment

Previous Post Next Post