विसर्जनासाठी गेलेले दोन मुस्लिम बांधव बुडाले। पनवेल मधील घटना ।

विसर्जनासाठी गेलेले दोन मुस्लिम बांधव बुडाले। पनवेल मधील घटना । 

कोपरोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान रात्री भोरदार (गाढी) नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. त्याला वाचवण्यासाठी एक जण गेला असता तोही वाहून गेला. त्यानंतर दुसरा बॅटरी घेऊन धावत आला तो देखील वाहत गेला त्याच्या पाठोपाठ आलेले अन्य तिघेजण देखील वाहून जाऊ लागले. रात्रीची वेळ असल्याने यातील दोघेजण बेपत्ता झाले. तर चौघेजण बाहेर निघाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

यामध्ये वाहून गेलेल्यांमध्ये विक्रम जमादार (20) तर दुसरा शेखर माणिक जमादार (19) अशी असून त्यांचा शोध सुरू आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात गणपती विर्सजन हे नदीतच होणार अशी आडमुठी भूमिका घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. दरम्यान गणपती विसर्जन हे खणीत किंवा कुंडामध्ये करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाला न जुमानता काही नागरिक पंचगंगा नदीत गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी दोन युवक वाहून गेले यातील एकाला वाचवण्यात यश आले तर दुसरा वाहून गेला. यामुळे नदीत गणपती विसर्जन करणारचं या लोकप्रतीनिधींच्या युवकांना खो घालणाऱ्या भूमिकेवर नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

घरगुती गणपतीचे विसर्जन करत असताना स्वप्नील मारुती पाटील (वय 22, रा. गल्ली नंबर 8, दत्तनगर कबनूर) हा रुई येथील युवक पंचगंगा नदीत वाहून गेला. तर नागरिकांनी विशाल पाटील या युवकाला वाचविण्यात यश आले. काल (दि.05) दुपारी 4.30 सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे स्वप्नीलला पोहायला येत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सोमवारी घरगुती गणपतीचे विसर्जन असल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई येथे पंचगंगा नदीवर मोठी गर्दी होती. इंगळी गावाकडील बाजूस स्वप्नील गणपती विसर्जन करीत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.

Post a Comment

Previous Post Next Post