आरोग्य विभाग जिल्हा परिषद भ्रष्टाचाराची चौकशी करा
यशवंत पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग नेहमीच वादात राहिला असून कोरोना संक्रमण काळात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वप्रकारचे औषधे यंत्रसामुग्री वस्तू बेडशीट चादरी रुग्णांसाठी कॉट रुग्णउपयोगी साहित्य जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य मोठया प्रमाणात खरेदी केले असून यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपयाचा चुना राज्य सरकार ला लावला आहे या बाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे
जिल्हा परिषद मधील आरोग्य अधिकारी गेली अनेक वर्षापासून त्याच पदावर कार्यरत असून त्यांना अभय कोणाचे? असा प्रश्न यशवंत पवार यांनी उपस्थित केला असून त्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे त्याच बरोबर गेली वर्षापासून त्याच पदावर कोणी नियुक्ती केली? याची देखील चौकशी व्हायला पाहिजे
उपोषण करणार
जिल्हा परिषद आरोग्य विभागात फार मोठा भ्रष्टाचार असून याची सखोल चौकशी व कारवाई करण्यासाठी मा जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र सादर केले असून या बाबत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिली आहे
Tags
Top news