*अभियंता दिनानिमित्त सिंहगड कॉलेज रोटरॅक्ट क्लबकडून रक्तदान शिबिर*
पंढरपूर: नागेश काळे
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न मौक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवसाचे व "अभियंता दिवसाचे" औचित्य साधून पंढरपूर रोटरी क्लब, सिंहगड काॅलेज रोटरॅक्ट क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर येथील अक्षय ब्लड बॅक सोलापूर यांचे "रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती रोटरी क्लब सचिव सचिन भिंगे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या "रक्तदान शिबीराचे" उद्घाटन पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते करण्यात आले. या शिबिरात सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. यामध्ये जवळपास ११२ हून अधिक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी अभियंता दिनानिमित्त रक्तदान केल. या कार्यक्रमात अभियंता यांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूरचे सर्व सदस्य, सिंहगड काॅलेज रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा समृद्धी ताठे, सचिव विश्वजीत कस्तुरे, खजिनदार हसीन शेख,
राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांनी अक्षय ब्लड बँकेकडून भेट वस्तु देण्यात आली.
Tags
Top news