बोगस डॉक्टर प्रकरणी यशवंत पवार यांचे 2 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण
सोलापूर (प्रतिनिधी )रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा कोणताही अंकुश नसून कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मोहोळ मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी नवीन विडी घरकुल यासह इतर तालुक्यात देखील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन वेळीच कडक कारवाई जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करायला हवी होती परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना अभय देतात बोगस डॉक्टर वर कुठलेही कारवाई केली जात नाही ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा म्हणून
दिनांक 2/6/2022 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर
दिनांक 10/6/2022 रोजी मा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
दिनांक 11/7/2022 रोजी मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर
यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने
दिनांक 19/7/2022 रोजी मा मुख्य अप्पर सचिव सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई
यांच्याकडे ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा म्हणून ई-मेल द्वारे तक्रार केली होती सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी कुचराई करीत असल्याने
जिल्हाधिकारी यांना स्मरण पत्र
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने ग्राहक कल्याण फौंडेशन वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 11/8/2022 रोजी बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी म्हणून स्मरण पत्र देण्यात आले होते
आरोग्य उप संचालक पुणे यांच्याकडे तक्रार
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी टाळाटाळ करत असल्यामुळे ग्राहक कल्याण फौंडेशन वतीने आरोग्य उप संचालक पुणे यांची भेट घेऊन दिनांक 6/9/2022 रोजी लेखी पत्र सादर करण्यात आले होते
विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर बाबत अनेक ठिकाणी ग्राहक कल्याण फौंडेशन वतीने लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आरोग्य विभागाला अद्याप जाग आलेली दिसत नसल्याने व बोगस डॉक्टर कारवाई बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी उदासीन त्याच बरोबरसोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर ना पाठीशी घालत असल्याने ग्राहक कल्याण फौंडेशन वतीने विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दिनांक 6/9/2022रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती
जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यासाठी ग्राहक कल्याण फौंडेशन च्या तक्रारी ची जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दखल घेऊन बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी दोन वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना आदेश दिला होता परंतु हे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवले असून सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्यास कुचराई केली आहे
2ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण
सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने दिनांक 2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे
Tags
Top news