अयोध्येत पोहोचली 14 टन ची वीणा। ऐकू येणार लता दिदींचे सूर।
वास्तविक येथे एक वीणा बसवण्यात येणार आहे. या वीणेवर लक्ष्मी आणि सरस्वती यांच्यासोबत दोन मोरही साकारण्यात आले आहे. केवळ एका महिन्यात 70 कलाकारांनी तयार केलेल्या या वीणाची लांबी सुमारे 12 मीटर म्हणजेच 40 फूट आहे. वीणाची रुंदी 10 फूट असून तिचे वजन 14 टन आहे.
अयोध्येच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नयाघाट चौकाला लता मंगेशकर चौक असे नाव देण्यात आले असून, त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. लता मंगेशकर यांचा पुतळा नाही तर 40 फूट उंचीची वीणा येथे बसवण्यात येणार आहे. ती शुक्रवारी अयोध्येत पोहोचली आहे. लवकरच लता मंगेशकर चौकात मंगेशकरांनी गायलेली श्रीरामाची भजनं आणि वीणाचा मधुर आवाज लोकांना ऐकू येईल. सुमारे 8 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या लता स्मृती चौकाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.