देवीवरील 1100 किलो शेंदूराचे कवच काढण्यात आले आहे त्यामुळे श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. हे मूळ स्वरूप वेगळे असून देवीची मूर्ती अत्यंत मोहक दिसत आहे.
गुरुवारी या मूर्तीचे मुळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. त्यावेळी हे मनोहर रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मूळ मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी पार पडला. या तीनदिवसीय सोहळ्याच्या सांगतेनंतर मंदिर एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ, भाविक यांच्यासाठी खुले करण्यात आले होते.
श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू होतं त्यामुळे भाविकांना मंदिर बंद ठेवण्यात आले होते. आता येत्या 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे. दररोज शेकडो भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येत असतात मात्र आता देवीचं मुळरूप समोर आल्याने अनेक भाविकांना दर्शनाची ओढ लागली आहे.