VLC मीडिया प्लेअर वर भारतात बंदी।

VLC मीडिया प्लेअर वर भारतात बंदी। 

VLC Media Palyer वर भारतात बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. या बंदीमागे सुरक्षेचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
VLC Media Palyer वर डाटा चोरीचा आरोप केला जात होता. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या, त्यानंतर केंद्र सरकारनं यासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे. भारतात या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

साधारणतः गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर करुन हे अॅप डाऊनलोड केलं जातं. मात्र यापुढे या प्लॅटफॉर्मवर हे अॅप असणार नाही. दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN वेबसाईटवर बंदी घातली आहे. 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post