रक्षाबंधन साठी पोस्टाची खास योजना।
आपल्या भावाला राखी पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी गर्दी केली आहे. पावसात ही राखी भिजू नये म्हणून पोस्टाच्या वतीने खास वॉटरप्रूफ पाकिटे तयार करण्यात आलेली आहे. बाजारात देखील यावेळी विविध आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत. दूर राहणाऱ्या भावाकडे राखी बांधण्यासाठी बहीण जाऊ शकत नाहीत.
मात्र, आता अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. बहिणी घरापासून लांब राहणाऱ्या भावांना राखी पाठवू शकतात. या कामासाठी टपाल विभागाची मदत घेऊ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खास राखी पाकिटांची विक्री सुरू झाली आहे. राखी लिफाफा पूर्णपणे जलरोधक आणि सुगंधी आहे. या लिफाफ्याच्या विक्रीसाठी विभागातर्फे विभागातील तीनही प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र काउंटर करण्यात आले आहेत.
लिफाफ्याची किंमत १० रुपये निश्चित करण्यात आली आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यावेळी ११ ऑगस्टला साजरा होणार आहे.
भावापासून दूर राहणाऱ्या बहिणींना राखी पाठवणे कठीण मानले जाते. अशा स्थितीत टपाल विभागाने दरवर्षीप्रमाणे विभागातील वर्धा पोस्ट ऑफिसमध्ये रक्षाबंधन विशेष राखीची विक्री सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र काउंटर बनवण्यात आले आहे. राखीचा लिफाफा पूर्णपणे जलरोधक असेल.
तसेच लिफाफा रंगीत असल्याने, इतर लिफाफ्यांपेक्षा वेगळा दिसतो. या लिफाफ्यात राखी ठेवून ती देशात कुठेही स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि सामान्य पोस्टाने पाठवता येते, अशी माहिती प्रधान डाकपाल अविनाश अवचट यांनी दिली. यावेळी राखी पौर्णिमेनिमित्त डायमंड स्टोन, मोती राखी, रेशमी राख्या यासह विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यासह बाजारपेठ भेटवस्तूंचे देखील फुलली आहे.
बदलत्या आवडी निवडीनुसार राख्यांमध्ये नवनवे प्रकार पहावयास मिळत आहेत. भाऊ बहिणीच्या अजोड नात्याला साजरे करण्यासाठी रंगीबेरंगी राख्यांनी शहरातील विविध भागातील बाजारपेठ सजल्या आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.