दैनिक साम्राज्य चा आदर्श पत्रकार रामचंद्र सरवदे यांना प्रदान

Maharastra now 24
0
दैनिक साम्राज्य चा आदर्श पत्रकार रामचंद्र सरवदे यांना प्रदान

ठाणे (प्रतिनिधी) : पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील  साप्ताहिक ठिणगी माध्यमातून वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी  नेहमीच प्रशासन दरबारात  आपल्या रोखठोक व सडेतोड देण्याच्या माध्यमातून प्रशासनला जागं करण्याचं काम  साप्ताहिक ठिणगीचे संपादक रामचंद्र सरवदे करत असून पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय शैक्षणिक सामाजिक व इतर बाबी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडत असून आपल्या लेखणीने भल्याभल्याना घायाळ करणारे रामचंद्र सरवदे यांना दैनिक साम्राज्य वृत्तपत्राचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला.
ठाणे येथील रॉयल इन सभागृहामध्ये अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलायावेळी थोर समाजसेवक अशोक संमेळ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे  उल्हासनगर अग्निशमन दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे अभिनेते दिग्दर्शक अमोल भावे अभिनेत्री श्रद्धा हांडे दैनिक साम्राज्य चे संपादक अरुण ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितत हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार मुळे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाई करणाऱ्या रामचंद्र सरवदे यांचे सर्वत्र कौतुक आहे

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)