भाज्यापासून आणि फुलांपासून तिरंगा ध्वाजाची रांगोळी काढत मुंबइकरांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला।

भाज्यापासून आणि फुलांपासून तिरंगा ध्वाजाची रांगोळी काढत मुंबइकरांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला। 

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तिरंगी वातावरण निर्माण झाले आहे. हर घर तिरंगा अभियानामुळे सर्वत्र तिरंगा ध्वजामुळे  देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सुद्धा गेले तीन दिवस तिरंगी रंगात  न्हाहून निघाली आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी फुले भाज्यातून मोठे तिरंगी ध्वज साकारण्यात आले तिरंगी रोषणाई याद्वारे करण्यात आलेल्या सजावटीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे


भाज्या आणि फुलांपासून सजावट - या देशाचा खरा मालक, पालनहार, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बळीराजा आजही उपेक्षित आहे. अशा ह्या बळीराजाच्या सन्मानार्थ, त्याच्या कार्याचा गौरव व्हावा ही संकल्पना ठेवून शेतकऱ्याकडून उत्पादित गाजर, लसूण, मिर्ची, वांगी, टोमॅटो, भेंडी, तसेच विविध रंगाच्या फुलांचा वापर करून उद्यान खात्याने "आर - मध्य" विभागाच्या प्रवेश द्वाराजवळ भारताच्या नकाशाची कलात्मक, तिरंगी व पर्यावरण पूरक प्रतिकृती  साकारली आहे. 12 बाय 12 या आकारात ही रांगोळी साकारण्यात आली असून त्याकरिता वीस किलो लसूण, 15 किलो टोमॅटो, आठ किलो मिरच्या, सहा किलो गाजर, पाच किलो भेंडी, तसेच झेंडू व अन्य फुलांचा कलात्मक वापर करण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागामार्फ़त मुलुंड पश्चिम स्वप्ननगरी येथील सरदार प्रतापसिंग मनोरंजन मैदानात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा फूलपाखरू साकारण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागामार्फ़त मुख्यालयासमोर फुलांची आकर्षक सजावट केली आहे.


तिरंगी रोषणाई - महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागामार्फत एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका पुरातन वास्तू ८, महापालिका इमारती ८२, शासकीय इमारती ४८, खासगी इमारती १०५ याप्रमाणे इमारतींचा समावेश आहे. महापालिकेच्या ५१ शाळा इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारती, १०० वृक्ष, ६० विद्युत खांब, थोर पुरुषांचे १९ पुतळे यांनाही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजेपासून थोड्या-थोड्या अवकाशाने प्रोजेक्शन मॅपिंग करण्यात येत आहे. याला मुंबईकर आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post