स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव अभियान पटवर्धन कुरोली येथे राबविण्यात आले
(पटवर्धन कुरोली येथे घरोघरी जाऊन तिरंगा ध्वज केले मोफत वाटप)
पंढरपूर प्रतिनिधी: संपूर्ण भारत देशामध्ये भारत सरकारच्या वतीने व भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत, हरुण शिकलकर व ग्रामसेवक श्री.चंद्रशेखर गिड्डे यांच्यावतीने घरोघरी जाऊन तिरंगा ध्वज देण्यात आला तसेच पटवर्धन कुरोली प्रशालेमध्येही विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज मोफत वाटप करण्यात आला आहे.
हे अभियान दिनांक 13 ते 15 ऑगस्ट रोजी या दरम्यान संपूर्ण भारत देशामध्ये राबवण्यात येणार आहे या अभियानातून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची चेतना निर्माण व्हावी व प्रत्येकाच्या "घरोघरी तिरंगा" ध्वज फडकविण्यात यावा यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत, हरूण शिकलकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर जवळेकर श्री.संतोष घुले श्री.मदन चिंचकर श्री.गणेश देशमुख श्री.ऋषिकेश कोळी श्री.तोरणे सर श्री.देशमुख सर ,क्षीराज पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.