रिलायन्स जिओने जगभरातील सर्वात तेज 5 जी रोल आऊट प्लान तयार केला असून 2022 च्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता या मेट्रो शहरांबरोबरच काही मोठ्या शहरांमध्ये 5 जी सेवा लॉन्च होईल. डिसेंबर 2023 पर्यंत भारताच्या प्रत्येक शहर, तहसील, तालुक्यापर्यंत ही सेवा वितरीत होईल असे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे.
5 जी सेवा सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक बाबींमध्ये उच्चतम गुणवत्तेशी जोडून घेईल. भारताला चीन आणि अमेरिकेपेक्षाही अधिक वेगाने डेटा संचलित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रतिबद्ध आहे, असे मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे.
