गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त
देशात सध्या 1 लाख 44 हजार 264 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 16,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासाह आतापर्यंत देशात 4 कोटी 30 लाख 97 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात रविवारी 2186 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2179 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 276 रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रात बी ए. 4 , बी ए. 5 व्हेरीयंटचे 19 रुग्ण तर बी. ए 2.75 चे 17 रुग्ण आढळले आहेत.
दिवसेंदिवस रुग्ण वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत.