पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची बिर्लासॉफ्ट कंपनीत निवड
पंढरपुर: प्रतिनिधी
बिर्लासॉफ्ट डोमेन, एंटरप्राइझ, डिजिटल तंत्रज्ञानाची जोडणी ग्राहक आणि त्यांच्या पारिस्थितिक प्रणालीसाठी व्यवसाय प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काम करते. ग्राहकांचा व्यवसाय चालविण्यात मदत करून त्याचा सल्लामसलत व डिझाइन विचार करण्याच्या पद्धतीमुळे कंपनी अधिक उत्पादक बनवते. अशा या बहुराष्ट्रीय नामांकित साॅफ्टवेअर कंपनीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील २ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील कासेगाव (ता. पंढरपूर) येथील मेघा दिलीप कानतुटे तर नेवरे (ता. माळशिरस) येथील अयेशा सलीम शेख या दोन विद्यार्थिनींची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन कंपनीकडून ४ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
बिर्लासॉफ्ट कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.