सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाणं आहे घातक; इतके गंभीर आजार वाढण्याचा धोका
सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण सकाळी खूपवेळ काहीच खात नाहीत. वजन कमी करण्याच्या प्रयत्नातही असणारे बरेच लोक असा विचार करून नाश्ता करणे सोडून देतात की, असे केल्याने कमी कॅलरीज शरीरात जातील.
परंतु, आपल्या या चुकीमुळे आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी आपण जे काही नाश्ता म्हणून खातो हे दिवसाचे पहिले आणि आवश्यक जेवण आहे, त्यामुळे ते नेहमी वेळेवर घेतले पाहिजे. अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आरोग्याला मोठा फटका सहन करावा लागतो. त्याचा परिणाम कदाचित सुरुवातीला कळत नाही, परंतु कालांतराने त्याचे नुकसान गंभीर स्वरूप धारण करू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, सकाळी उशीरापर्यंत काहीच न खाणे, न्याहारी न घेणं, यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाता राहणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका 27 टक्क्यांनी वाढू शकतो. सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाता राहिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
नाश्ता न करण्याचे इतर दुष्परिणाम -
नाश्ता न करण्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. नाश्ता स्कीप करण्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाता राहिल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. सकाळी नाश्ता वगळल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो.
सकाळी उशिरापर्यंत काहीच न खाता राहिल्याने मायग्रेनचे तक्रार वाढू शकते. केसगळतीबरोबरच पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो. हे नियमित नाश्ता केल्याने या अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो आणि हृदयही कमजोर होत नाही. सकाळची न्याहारी खूप महत्त्वाची आहे. सकाळच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.