शेतकऱ्यांना संधी 50 हजार रु बक्षीस मिळवण्याची । अधिक वाचा

0
शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य शासनाकडून 'खरीप पीक उत्पादन' स्पर्धा शेतकर्‍यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शेतकर्‍यास 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत शेतकर्‍यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरसुद्धा आयोजित करण्यात आली आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी (रागी), भात, ज्वारी, ज्वारी, भुईमूग, सूर्यफुल या 11 पिकांचा खरीप हंगाम पीक स्पर्धा 2022 मध्ये समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका घटक निश्चित केला असून, ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे संबंधित पिकाखालील किमान 10 आर. (0.10 हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे.

पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक व आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रती पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल.
पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे राज्य विभाग व जिल्हा स्तरावर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे.

तालुका पातळी – पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार, तिसरे 2 हजार
जिल्हा पातळी – पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे 5 हजार
विभाग पातळी – पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार, तिसरे 15 हजार
राज्य पातळी – पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार

खरीप हंगाम सन 2022-23 मध्ये पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत आहे. उडीद व मूग पिके, तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट 2022 आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !