*पंढरपूर सिंहगड विद्यार्थ्याकडून "वारी अँप" ची निर्मिती*
○ इंजिनिअरींग विद्यार्थ्यांकडून संशोधन: प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती
पंढरपूर:
दक्षिण काशी म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या आषाढी निमित्त १५ लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे. वारकऱ्यांना गर्दीच्या गर्दीच्या काळात मदत व्हावी म्हणून प्रथम यावर्षी आषाढी वारी मध्ये "पंढरीची वारी" हे मोबाईल अँप सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंदिर समितीच्या माध्यमातून तयार केले असल्याची माहिती काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजच्या काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या सुदर्शन मकर, आशुतोष देशपांडे, गौरव मुळे, सैफ शेख, अभिजित नलवडे आणि मोईन मुजावर या सहा विद्यार्थ्यांनी मंदिर समितीच्या मदतीने "पंढरीची वारी" हे अँप दिड महिन्यात तयार केले आहे.
आषाढी वारी मध्ये पंढरपूर मध्ये आलेल्या भाविक भक्तांना प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर मध्ये वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती उपलब्ध होणार आहे. हे अँप एका मिनिटात २५० हुन अधिक व्यकीच्या रिक्वेस्ट स्विकारून माहिती उपलब्ध करून देऊ शकते. याशिवाय पालखी मार्गावर वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.
मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी "पंढरीची वारी" हे अँप तयार केले आहे.
हे अँप ॲनराॅइड मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन "Pandharichi wari" या नावे डाऊनलोड करतात येईल. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास एक तास बदल करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या अँपचे वारक-यांमधुन कौतुक होत आहे.
*अशी मिळणार अँप माहिती*
ज्या महामार्गावरून दिडी सोहळा येणार आहे तो महामार्ग ते पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत अँप वारकऱ्यांना माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलीस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हाॅस्पिटल, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालय आदी गोष्टी अँप मध्ये दिसणार आहे.