*पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड*


पंढरपूर : प्रतिनिधी

       कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सात विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कॅपजेमिनी कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.           
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. कोरोना कालावधीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात ऑनलाईन घेण्यात आलेल्या मुलाखतीमधून काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रथमेश जाधव, अरबाज शेख, सुवर्णा शिंदे,  पुजा जुंदळे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील वर्षा पाटील, तेजस्विनी नागमल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील रचना राऊत आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे. कॅपजेमिनी कंपनी कडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज तीन लाख ते पाच लाख पन्नास हजार पर्यंत मिळणार आहे. या निवडीबद्दल पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
    कॅपजेमिनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. मेघा गोरे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post