शरद पवारांच्या वाढदिवस निमित्त दिवाकर मित्र परिवाराकडून समाजातील उपेक्षित घटकांचा सत्कार सन्मान संपन्न

 शरद पवारांच्या वाढदिवस निमित्त दिवाकर मित्र परिवाराकडून समाजातील उपेक्षित घटकांचा सत्कार सन्मान संपन्न

सोलापूर प्रतिनिधी /- 

शेतकऱ्यांचे कैवारी, देशाचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय शेती - संरक्षण मंत्री, पद्मविभूषण असे अनेक बिरुदावली असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुळे सोलापूर भागातील प्रभाग २४ मधील अनेक उपेक्षित घटकांचा अर्थात ज्यांचे महत्त्व रोजच्या दैनंदिन जीवनात असते असे समाजसेवेत मोलाचे योगदान देणार पण कधी त्यांचा सत्कार सन्मान झालेला नसतो असे वृत्तपत्र विक्रेते, घंटागाडी वाहक, कचरा गोळा करून झाडलोट करून स्वच्छता ठेवणाऱ्या, गाडी मेकॅनिक, लॉन्ड्री व्यावसायिक, दूध व्यावसायिक तसेच केश कर्तन करणारे सलून व्यावसायिक यांचा तसेच क्रीडा शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकारिता करत समाजात एक नवीन पिढी घडविण्याचे काम करणारे सन्माननीय व्यक्ती यांचा आज हॉटेल बासुरी येथे संपन्न उर्फ विकी चंद्रकांत दिवाकर यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सत्कारमूर्ती यांना पुष्प शाल तसेच सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी श्री.शंकर पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे निसार नुरुद्दीन शेख सर व पक्षाचे प्रशांत बाबर, अजित पात्रे, राकेश सोनी, मिलिंद गोरे, लता ढेरे, झहीर गोलंदाज, मल्हार शिंदे आदी मान्यवर पदाधिकारी तसेच दैनिक दिव्य मराठी चे उपसंपादक श्री युसुफ शेख हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post