शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नागनाथ मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन आणि शालेय साहित्याचे वाटप!

 शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नागनाथ मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन आणि शालेय साहित्याचे वाटप!

शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण; शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी केले आयोजन.

प्रतिनिधी पंढरपूर /- 

आज 14 डिसेंबर रोजी बाभुळगाव येथील नागनाथ मूकबधिर शाळा येथे देशाचे नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत, उद्योग व व्यापारचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, प्रदेश सदस्य जयंत भंडारे सर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, प्रदेश सदस्य विजय काळे, उद्योग व व्यापारच्या तालुकाध्यक्ष सावली बंगाळे, पुणे विभाग सचिव संजय शिंदे, शिक्षक सेल तालुका अध्यक्ष संतोष पवार, शिक्षक सेल शहर अध्यक्ष विवेक जगताप, युवा नेते महेश शिंदे, सोमनाथ गोरे, मंगल शिंदे, बाळासाहेब खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी केले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शरद पवार साहेबांचे कार्य आणि विचारांवर प्रकाश टाकला, तसेच मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रोपे लावून त्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेला आणि पवार साहेबांच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post