तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोडनिंब मध्ये बैठक संपन्न

Maharastra now 24
0
तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोडनिंब मध्ये बैठक संपन्न

मोडनिंब प्रतिनिधी : चंद्रकांत ओहोळ

तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबुध्द भारत बहुउद्देशिय मागासवर्गीय सामाजिक संस्था मोडनिंब यांची नियोजन बैठक डाॅ.आंबेडकर नगर , मोडनिंब येथे संपन्न झाली.  
या बैठकीमध्ये प्रबुद्ध भारत जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद गायकवाड, उपाध्यक्ष पदी तन्मय समाधान ओहोळ यांची निवड करण्यात आली.
  अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान सदस्य पदी विलास तात्या गायकवाड यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तात्यांचा सत्कार महेश नाना शिंदे व ग्रामपंचायत सदस्य अमर दादा ओहोळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच बोध्दीसत्व जयंती उत्सव  मंडळाचे अध्यक्ष गणेश नाईक यांचा सत्कार जीवन ढावरे व गणेश ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. संतोष लंकेश्वर यांचा सत्कार सचिन आबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला, कृष्ण ओहोळ यांचा सत्कार प्रदीप गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
तसेच खालील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष- विनोद गायकवाड उपाध्यक्ष - तन्मय समाधान ओहोळ 
कार्याध्यक्ष-पियुष गायकवाड
सचिव -जितेंद्र शिंदे 
सहसचिव- रुपेश ओहोळ खजिनदार-विश्वजीत ओहोळ, दत्ता शिंदे.
मिरवणूक प्रमुख- सिद्धू गायकवाड, विवेक ढावरे
सजावट प्रमुख- सचिन आबा गायकवाड, विक्रम थोरात, चंद्रकांत ओहोळ,  प्रदीप गाडे, सनी गायकवाड, चंद्रकांत शिंदे, साई नाईक.
सत्कार प्रमुख - प्रसाद फडतरे, अभिषेक गायकवाड, रवी शिंदे, समाधान जानराव, अतिश ओहोळ, 
सल्लागार-लक्ष्मण जानराव ,
बंडू मामा गायकवाड, प्रताप रणदिवे, उल्हास खरे, सचिन खरे, सोनू सरवदे, शहाजी ढावरे, संजय मामा ढावरे, नवनाथ कसबे,
पी.बी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ वाघमारे यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याची आश्वासन दिले व त्यासाठी लागेल ते योग्य दान देण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.
नियोजन बैठकीला मार्गदर्शन मा.अमर दादा ओहोळ(ग्रा.पं.सदस्य) व संजीव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मीटिंगमध्ये 99,500/ रुपयांची वर्गणी देणगी जमा झाली.
यावेळी असंख्य भीमसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)