श्री राम नवमी निमित्त महोत्सव आयोजित
प्रतिनिधी अमर कांबळे
जगाच्या कानाकोपऱ्यात विस्थापित झालेली संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रुष्ण भावना म्रुत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने दरसालाबादप्रमाणे श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर पंढरपूर येथे श्री राम नवमी निमित्त मोठ्या प्रमाणात महोत्सव आयोजित केला जातो,
या कार्यक्रमाचे आयोजन भुवैकंठ प्रकल्प डायरेक्टर अध्यक्ष प्रल्हाद दास व उपाध्यक्ष धनौद्य अर्जुनदास यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते,
आंतरराष्ट्रीय क्रुष्ण भावना म्रुत संघ (इस्कॉन) श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर येथे दररोज अनेक परदेशातुन व स्वदेशातुन भक्त येत असतात, या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, व दररोज भक्तांन साठी अन्नभोजन मोफत दिले जाते, व भक्तांची सेवा केली जाते, तसेच इस्कॉन संस्थेकडे अनेक युवक वर्ग आकर्षक होताना दिसत आहे, संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम हे सर्व भाविकांना आकर्षित करत असतात, या संस्थेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी सन्मान केला जातो, इस्कॉन ,संस्थेकडे सर्व परदेशातील मान्यवरांनमधून आदर व्यक्त होत आहे, तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री राम नवमी निमित्त दि-30-3-2023-वार गुरुवार-रोजी पंढरपूर शहरात भव्य अशी मिरवणूक काढून महोत्सव व अनेक मान्यवरांचा सन्मान आयोजित केला जात आहे,तरी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष भुवैकंठ प्रकल्प डायरेक्टर प्रल्हाददास व उपाध्यक्ष धनौद्य अर्जुनदास यांच्या वतीने या महोत्सवास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व इस्कॉन या संस्थेची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे,
