जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल त्यास कायम मतदान करणार- रियाज मुलानी

जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल त्यास कायम मतदान करणार- रियाज मुलानी

विविध संघटनेचा जुनी पेन्शन साठी लढा कायम राहणार बैठकीत निर्णय


पंढरपूर(प्रतिनिधी):- जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी व ती मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील जो पक्ष जुनी पेन्शन मंजूर करेल त्याच पक्षाला कायम मतदान करण्याचा निर्णय तसेच विविध संघटनेचा जुनी पेन्शन साठी लढा कायम राहणार असा महत्त्वपूर्ण  निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलानी यांनी दिली.
येथील विश्रामगृह मध्ये जुनी पेंशन संघटनेच्या वतीने शासकीय विभागातील सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार बैठक संपन्न झाली. 
  
जुनी पेंशन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलाणी यांनी सर्व संघनटना पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचारी यांनी धाडसाने लढल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच पुढील ३०० दिवसांच्या जुनी पेंशन लढ्यामध्ये कोणत्या प्रकारे लढा उभा करायचा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम,ग्रामसेवक, तलाठी,पाटबंधारे, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण,आरोग्य विभाग,लिपिक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, रयत सेवक संघ, कृषी विभाग, यांत्रिकी उपविभाग, चतुर्थश्रेणी संघटना आदी संघटना व विभाग सहभागी होते. 
 
राज्यात सध्या अठरा लाख कर्मचारी आहेत. महाराष्ट्रापेक्षा मागासलेल्या राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू आहे. मग महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. याचबरोबर महत्त्वाचा असलेला व राज्याने सुरू केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या भरतीस सर्व उपस्थितांच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. सर्वानुमते जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी यापुढेही प्रखर लढा सुरूच ठेवायचा आहे. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला तरी जुनी पेंशन मिळेपर्यंत लढा चालुच ठेवण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्व विभागील कर्मचाऱ्यांना या लढ्यात सहभागी करून घ्यावे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या समन्वय संघटनेचे संरक्षण लाभेल. त्यामुळे कोणीही काळजी करू नये असे सर्वानुमते ठरले.

सदर बैठकीत धनाजी म्हस्के,प्रशांत कोळसे,मयुर कोळी, सुरेश इंगोले, साळुंखे आदी मान्यवरांनी जुनी पेंशन लढ्याची पुढील दिशा कशी असावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. बैठकिचे अध्यक्ष शरद भुजबळ, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना सोलापूर यांनी जुनी पेंशन लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सर्व विभागातील संघटनांचा समन्वय होऊन महाराष्ट्रामध्ये प्रथमच पंढरपूर पॅटर्न तयार झाला असल्याचे घोषित केले. 
  
यावेळी सूत्रसंचालन अविनाश बुरांडे , कार्याध्यक्ष यांनी केले. तसेच मान्यवरांचे स्वागत सत्कार विकास बढे कोषाध्यक्ष, प्रकाश तोटेवाड सरचिटणीस, हुसेन मुलाणी  प्रसिद्धी प्रमुख ,बालाजी गालशेटवार प्रसिद्धी प्रमुख यांनी केले. विकास बढे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post