राजेश दामले म्हणाले, 'गोखलेंची परिस्थिती मागील २४ तासांपासून प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांचे प्रयत्न करत आहेत. उपचारांना शरीर साथ देत नाही. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. शरीराचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. कोणत्याही अफवा, चुकीची माहिती पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका.
दरम्यान त्यांच्या निधनाचे खोटी बातमी पसरली होती. सोशल मीडियावर गोखले यांना श्रद्धांजलीही अर्पण होत होती. अनेक कलाकार यांना विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली, माध्यमांमध्ये बातम्या पसरल्या. मात्र त्यांची पत्नी आणि मुलीने हे वृत्त फेटाळले. निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र त्यांची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती कुटुंबाने दिली.
गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी असे सांगितले की, 'काल दुपारच्या दरम्यान कोमात गेले, त्यानंतर त्यांनी स्पर्शाला, प्रतिसाद दिला नाही. गोखले हे आता व्हेंटिलेटरवर आहेत.