मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट, प्रकृतीबाबत दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट, प्रकृतीबाबत दिली माहिती

प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात आज ( ४ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जात भेट घेतली.

तसेच, प्रकृतीबाबात विचारपूस केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला.

“शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद पवार यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन त्यांच्या काही टेस्ट करतील. परत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

Post a Comment

Previous Post Next Post