पंढरपूर कराड रोडवर सोनके येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

पंढरपूर कराड रोडवर सोनके येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

प्रतिनिधी : पंढरपूर 

आज पंढरपूर ते कराड रस्त्यावर सोनंके येथे ऊस दर संघर्ष समिती व ऊस ऊस उत्पादक शेतकर्यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आमची मागणी सोलापूर जिल्ह्यातील ऊसाला पहिली उचल 2500 रूपये व फायनल 3100 रूपये मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली कारण गेली दहा दिवस झाले गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू होते 
परत ह्या मार्गाने कारखानदाराला व प्रशासनाला भाषा कळत नसेलतर ह्या जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज रस्ता रोकोच्या माध्यमातून दोन दिवस कार्तिकी वारीमुळे दोन दिवस थांबलेलो आहोत व त्यानंतर अल्टीमेट दिला आहे जर दोन दिवसात पहिली उचल जाहीर नाही केली तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमनला  रस्त्यावर फिरू देणार नाही  यावेळी दिपक भोसले,समाधान फाटे,माऊली हळणवर, माऊली जवळेकर, यांनी मार्गदर्शन केले तानाजी बागल,रणजित बागल,विश्रांती भुसणर,बाळासाहेब जगदाळे, अनिल बागल सचिन वागणे रमेश नागणे तानाजी गोपणे,मल्लारी खरात,बाबा हाके,दत्ता खरात सरपंच,नवनाथ हाके,सर्जराव मासाळ,समाधान महानवर अनेक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते

Post a Comment

Previous Post Next Post