गाव खेड्यातील जमीनेचे सरकारी भाव आता घरबसल्या जाणून घ्या "अश्या" पद्धतीने ;

गाव खेड्यातील जमीनेचे सरकारी भाव आता घरबसल्या जाणून घ्या "अश्या" पद्धतीने ; 

अनेक व्यक्ती सध्या शहर सोडून गावाकडे शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. शहरात नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे तसेच बेरोजगारीला सामोरे जावे लागते. अशात गावी एखादी जमीन घेऊन त्यात शेती करताना आधी आपल्याला त्या जमिनीचा दर माहीत असणे गरजेचे आहे.

आता तुम्ही जर गावाकडे जमीन अथवा घरासाठी जागा पाहत असाल तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. जेव्हा आपण नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला त्या जमिनीचा सरकारने ठरवलेला दर किती आहे हे माहीत असेल पाहिजे. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसच्या फेऱ्या न करता घरबसल्या ही माहिती मिळवता येऊ शकते.

ऑनलाईन पद्धतीने ही माहिती तुम्ही कधीही आणि कुठेही मिळवू शकता :
* यासाठी प्रथम तुमच्या गुगलमध्ये igrmaharashtra.gov.in हे सर्व करा.
* यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र शासनाची मुद्रांक विभाग आणि नोंदणीची वेबसाईट समोर येईल.
* यानंतर डाव्या दिशेला असलेल्या टॅबवर क्लिक करा.
* तिथे मिळकत मुल्यांक हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.
* त्यानंर पुढे बाजारमूल्य दर पत्रक तुम्हाला दिसेल.
* त्यावर महाराष्ट्र शासनाचा नकाशा देखील असेल.
* त्यानंतर आधी जिल्ह्याची एक यादी तुम्हाला दिसेल.
* त्यापैकी जिथे तुम्ही जागा पाहत आहात.
* ती ज्या जिल्ह्यात येते तो जिल्हा निवडा.

प्रत्येक वर्षाने जमिनीचे दर बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला ज्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष निवडा. नंतर तालुका आणि गाव या पर्यायात तुमचे गाव आणि तालुका नीट निवडा. असे केल्यावर तुम्हाला त्या जमिनीचे सरकारी दर किती आहेत हे समजेल. यावर दिसणार दर हा प्रती हेक्टर नुसार आहे. हे लक्षात ठेवा. यामध्ये तुम्ही बागत जमीन, जिरायत जमीन, हायवे लगत आलेली जमीन, एमयडीसी अंतर्गत येणारी जमीन या सर्व प्रकारच्या जमिनींचे भाव तुम्हाला समजतील.

Post a Comment

Previous Post Next Post