एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचं दिवाळी गिफ्ट पाच हजार रुपयांचा दिवाळी बोनस कष्टकऱ्यांची दिवाळी गोड

Maharastra now 24
0

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचं दिवाळी गिफ्ट पाच हजार रुपयांचा दिवाळी बोनस कष्टकऱ्यांची दिवाळी गोड 

प्रतिनिधी : महामंडळाच्या वतीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीसाठी राज्य सरकारने 45 कोटींची मदत जाहीर केली होती.

एसटी महामंडळाने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचा फायदा महामंडळाच्या 87 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला 5 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली असल्याची माहिती व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलिनीकरण आदींसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन बरेच दिवस चिघळले होते. त्याच्या परिणामही एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता.

दरम्यान, याआधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 2500 रुपये आणि 5000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात येत होती. यंदाच्या वर्षी मात्र कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)