राज्यातील पत्रकारांचे प्रश्न लवकर सोडवा अन्यथा बातम्यावर बहिष्कार

राज्यातील पत्रकारांचे प्रश्न लवकर सोडवा अन्यथा बातम्यावर बहिष्कार

रामचंद्र सरवदे यांचा राज्यसरकार ला इशारा 

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने  राज्यातील पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकरिता विमा योजना स्वतः च्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना 
  यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती खंडणी व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणे राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकारांच्या जिव्हाळ्या च्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून पत्रकार सुरक्षा समितीने राज्यातील अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवले असून उर्वरित पत्रकारांच्या प्रश्नावर आता  राज्य सरकार ने लक्ष घालून राज्यातील  पत्रकारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले पाहिजेत अन्यथा राज्य सरकार च्या बातम्यावर पत्रकार सुरक्षा समिती बहिष्कार टाकणार असा इशारा

पत्रकार सुरक्षा समितीचे  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी राज्य सरकार ला दिला आहे

Post a Comment

Previous Post Next Post