इंडिगो च्या एमडिंना पार्लेजी ची भुरळ । विमान प्रवासात घेतला आस्वाद।

इंडिगो च्या एमडिंना  पार्लेजी ची भुरळ ।  विमान प्रवासात  घेतला आस्वाद। 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक आणि एमडी राहुल भाटिया चहासोबत पार्ले-जीचा आनंद घेताना दिसत आहेत. ५ रुपयाचे पार्ले-जी खाते असलेल्या या प्रसिद्ध उद्योगपतीला पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाटिया चहात बुडवत पार्ले-जी बिस्किट खात आहेत, त्यांच्या समोरच्या टेबलावर पार्ले-जी बिस्किटांचे ५ रुपये किमतीचे छोटे पॅकेट आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


पारले-जी 82 वर्ष जुना ब्रँड आहे. याची सुरुवात मुंबईतील विले-पार्ले भागातील एका बंद पडलेल्या जुन्या कारखान्यातून झाली. 1929मध्ये मोहनलाल द्याल नावाच्या एका व्यापाऱ्यानं हा कारखाना विकत घेतला. तिथं त्यांनी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम सुरू केलं. भारताच्या या पहिल्या कन्फेक्शनरी ब्रँडचं नाव त्या ठिकाणावरून पडलं. हा कारखाना सुरू झाला तेव्हा तिथं केवळ घरातील लोकच काम करत होती.

कारखाना सुरू झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1939 साली इथं बिस्किट बनवण्याचं काम सुरू झालं. त्याच वर्षी या बिझनेसला अधिकृत नाव देण्यात आलं. पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने इथं बिस्किट बनू लागले. कमी किंमत आणि चांगल्या क्वालिटीमुळे अल्पावधीतच ही कंपनी लोकप्रिय झाली. त्यावेळी या पारले बिस्किटचं नाव पारले ग्लुको होतं.

Post a Comment

Previous Post Next Post