'स्वयंवर मिका दी वोटी' चा फिनाले पार पडला। मिका ने निवडली बायको म्हणून 13 वर्ष जुनी मैत्रीण।
आकांक्षाने या स्वयंवरामध्ये प्रांतिका दास आणि नीत महल या दोघींना मागे टाकत मिका सिंहच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सूत्रांच्या मते, मिका सिंहला या तिघी सुद्धा फार आवडल्या होत्या. परंतु आकांक्षाने मिका सिंहचे मन जिंकून मीका सिंहच्या मनात स्थान निर्माण केले. दरम्यान, आकांक्षा आणि मिका सिंह खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतात.
अशातचं मिका दी वोटीच्या फिनालेमध्ये मिका सिंहने आकांक्षाची निवड केली. मात्र, आकांक्षा पुरीसोबत मिका सिंह या शोमध्ये स्टेजवर लग्न करणार नाही. मिका सिंहने सांगितले की, त्याने आकांक्षाला वरमाला घातली कारण त्याला आकांक्षा आवडते. परंतु तो काही दिवस आकांक्षा सोबत वेळ घालवणार आहे आणि त्यानंतरच सात फेरे घेतील. शिवाय ते आकांक्षाच्या कुटुंबातील लोकांना देखील भेटतील. खरंतर आकांक्षा आणि मीका गेल्या १३ वर्षांपासून चांगले मित्र आहेत. मिका दी वोटीमध्ये आकांक्षाने वाइल्ड कार्ट कंटेस्टेंट म्हणून एन्ट्री घेतली होती.
यादरम्यान, आकांक्षाने सांगितले की, जेव्हा तिने मिका सिंहला इतर मुलींसोबत पाहिले तेव्हा तिने या कार्यक्रमात येण्याचा निर्णय घेतला. तिने स्वताः चॅनला या शोमध्ये येण्यासाठी अप्रोच केलं होतं.