कासेगाव जिल्हा परिषद गट आणि टाकळी पंचायत समिती गणासाठी नागेश फाटे यांचा शड्डू; कार्यकर्त्यांच्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल!

 कासेगाव जिल्हा परिषद गट आणि टाकळी पंचायत समिती गणासाठी नागेश फाटे यांचा शड्डू; कार्यकर्त्यांच्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल!

​पंढरपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, कासेगाव जिल्हा परिषद गट आणि टाकळी पंचायत समिती गणातून युवा नेतृत्व नागेश एकनाथ फाटे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.

यावेळी नागेश फाटे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. "जनतेचे प्रश्न सोडवणे आणि विभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे," असा विश्वास फाटे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. नागेश फाटे यांच्या उमेदवारीमुळे कासेगाव गट आणि टाकळी गणात निवडणुकीची रंगत वाढली असून, तरुण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post