Dadasaheb Falke birth anniversary: दादासाहेब फाळके जन्म दिवस

Dadasaheb Falke birth anniversary: दादासाहेब फाळके जन्म दिवस

दादासाहेब फाळके ...चित्रपटाचं सोनेरी स्वप्न पाहिलेला एक अवलिया. लोकांच्या कुचेष्टेला सामोरे जाऊन  दादासाहेबांनी पाहिलेलं चित्रपटाचं स्वप्न आज प्रत्येक भारतीय अभिमानाने मिरवतो .  आज चित्रपट हे सहज उपलब्ध असणारं माध्यम बनलं आहे त्याचं सारं श्रेय दादासाहेब फाळके नावाच्या महान आणि ध्येयवादी अवलियाला जातं.


चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती. त्यांनी निर्माण केलेली ही चित्रपटाची जादू आज भारतभर पसरलीच नाही ते एक मोठं क्षेत्र बनली. म्हणूनच त्यांना चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाते. त्यानिमित्ताने पाहूया त्यांचा जीवनप्रवास.

दादासाहेबांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये सण 1890 ला प्रावीण्य मिळवले.

आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेबांच्या या धडपडीमागे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई (दुसरी पत्नी) यांची मोलाची साथ होती. आपल्या पतीचे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सरस्वतीबाईंनी आपले दागिने देखील विकले.

चित्रपटाशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, शिवाय हे करून चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.


Post a Comment

Previous Post Next Post