पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी
१ कोटी रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे
मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या ३०५४ योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष सदस्य आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते. सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी झाली आहे.
सदर निधी अंतर्गत मंजूर झालेले रस्ते व निधी रक्कम -
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द ते आसबेवाडी रस्ता सुधारणा करणे ३० लाख, बोराळे ते भालेवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, वाघमोडे वस्ती ते भोसे वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, रेवेवाडी ते तम्मा चौगुलेवस्ती रस्ता सुधारणा करणे १५ लाख तसेच पंढरपूर तालुक्यातील चिचुंबे ते सिद्धेवाडी रस्ता सुधारणा करणे २० लाख*.
Tags
Top news