मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व शहरात मांस, मटण विक्रीस मनाई

Maharastra now 24
0
मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व 
 शहरात मांस, मटण विक्रीस मनाई

पंढरपूर, दि. 27 :- चैत्र  शुध्द एकादशी 02 एप्रिल 2023 ला असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारी कालावधीमध्ये मंदीर परिसरात नारळ विक्री  करण्यास व नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आहे. 
तसेच चैत्र वारी कालावधीमध्ये पंढरपूर  शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत. 
नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने घसरंती होऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी फौजदारी संहितेच्या कलम 144 अन्वये दिनांक 01 ते 03 एप्रिल 2023 या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे. तसेच शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  दिनांक 01 ते 03 एप्रिल 2023 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी गुरव यांनी पारित केले आहेत.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)