थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

Maharastra now 24
0
थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध
पंढरपूरः  'शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते  शुक्रवार, दि.२१ ऑक्टोबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया सोमवार, दि.१० ऑक्टोंबर २०२२ पासून सुरु झालेली असून शुक्रवार, दि.२१ ऑक्टोंबर २०२२ च्या सायं. ४ वाजेपर्यंत चालणार आहे. रजिस्ट्रेशन साठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-८०० रु.आणि इतर प्रवर्ग-६०० रु. असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. या वर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४) व प्रा.पोपट आसबे (मोबा.नं.- ७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.  प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत  होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)