जगातील सर्वाधिक वजनाचा मासा ; वजन आहे 2744 किलो

जगातील सर्वाधिक वजनाचा मासा ; वजन आहे 2744 किलो 

जगातील एकापेक्षा एक अजस्र  आणि महाकाय प्राणी असतात. पृथ्वीपेक्षाही समुद्रात असणाऱ्या अशा प्राण्यांची संख्या अधिक असते. विशेषतः समुद्रात असणाऱ्या माशांमध्ये कुठला मासा सर्वाधिक भयंकर, कुठला सर्वात मोठा, कुठला सर्वाधिक धोकादायक याची उत्सुकता अनेकांना असते आणि त्याबाबत वेगवेगळ्या चर्चाही झडत असतात.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सर्वात वजनदार माशाविषयी. या माशाचं नाव आहे होली मोला . समुद्रात एखादा पॉपकॉर्न वाटावा, एवढ्याशा आकारापासून या माशांचं आयुष्य सुरु होतं आणि पाहता पाहता त्यांचं वजन इतकं वाढत जातं, की हा सर्वाधिक वजनाचा मासा बनतो. जगात आढळून येणाऱ्या माशांच्या प्रजातीपैकी ही सर्वात वजनदार प्रजाती मानली जाते.

समुद्रात आढळणाऱ्या या सर्वाधिक वजनदार माशाचे वजन आहे 2744 किलो. या माशाचा आकार तुम्हाला संभ्रमात टाकण्याची शक्यता आहे. हा मासा एकाच वेळी जितका अजस्त्र दिसतो, तितकाच तो गोजिरवाणाही दिसतो. महासागरात दिसणारा हा मासा समुद्रात अस्तित्वात असणाऱ्या सर्व प्रजातींमध्ये सर्वाधिक वजनदार मानला जातो. हा तीन मीटरपेक्षा जास्त लांबीचा असतो. समुद्रातील सर्वात खोल भागात राहणं, हे मासे पसंत करतात.

डिसेंबर 2021 मध्ये पोर्तुकालच्या एका द्वीपसमूहात मृत्युमुखी पडलेला सनफिश सापडला होता. मृत्यू झाल्यानंतर समुद्राच्या पाण्यावर तरंगत तरंगत या माशाचा मृतदेह किनाऱ्यावर आला होता. या माशाची लांबी 3.59 मीटर एवढी होती तर त्याचं वजन होतं 2744 किलो. त्यावरूनच हा जगातील सर्वाधिक वजनाचा मासा असल्याचे सिद्ध झाले होते.

आतापर्यंत सर्वाधिक वजनाचा मासा हा 2300 किलोंचा असल्याचं दिसून आलं होतं. 1996 साली जपान मध्ये हा मासा सापडला होता. मात्र आता नव्याने आढळून आलेला हा मासा आधीच्या माशापेक्षा जवळपास अर्धा टन म्हणजेच 444 किलोग्रॅम अधिक वजनाचा असल्याचे दिसून आला आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक वजनाचा मासा, अशी नोंद या माशाच्या नावे झाली आहे. या अतिविशाल अशा माशावर अजूनही शोध सुरू आहे. या माशाचा मृत्यू नेमका कसा झाला असावा, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या माशाच्या डोक्यावर एक जखम असल्याचे दिसून आले आहे. या जखमेच्या भागात रंग लागल्याचेही दिसून आलं आहे. त्यामुळे एखाद्या जहाजाला धडकून या माशाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र या माशाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. समुद्रात एवढा वजनदार मासा अस्तित्वात असल्याचे आतापर्यंत शास्त्रज्ञांना दिसलेच नव्हते. कारण माशांची ही प्रजाती खोल समुद्रातून बाहेर येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच या माशाचे अंडे किंवा इतर कुठलेही पुरावे आजवर समोर आले नव्हते.

Post a Comment

Previous Post Next Post