IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रवींद्र जडेजानं सांगितला Weather report,

Maharastra now 24
0

IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रवींद्र जडेजानं सांगितला Weather report,


  भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना आज होणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियान वेस्ट इंडिज गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. पण, हवामान यात अडथळा ठरू शकतं. कारण, तिसऱ्या वनडेदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसरी वनडे पावसात वाहून जाऊ शकते. यातच आता रवींद्र जडेजानंही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. त्यानं इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ  शेअर केलाय. हे पाहता पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाचा पाऊस पडू शकतो, असं वाटतंय.



AccuWeather च्या अहवालानुसार बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दिवसभर पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक आहे. 5 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि मधूनमधून पाऊस पडू शकतो. तापमान 30 अंशांच्या आसपास असेल. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 20 किमी राहू शकतो. अशा परिस्थितीत जर सामना असेल तर वेगवान गोलंदाजांना या स्थितीत फायदा होऊ शकतो. मात्र, सामना होण्याची आशा फार कमी आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)