राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मान्यवरांनी केला स्वेरीचा अभ्यास दौरा

संशोधन व अभ्यासपूरक वातावरण यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल
                                                                                                            - संचालक डॉ. प्रकाश इटनकर 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मान्यवरांनी केला स्वेरीचा अभ्यास दौरा
पंढरपूर – ‘उच्च तंत्र शिक्षणाच्या बाबतील राज्यात अग्रेसर असलेल्या स्वेरी अभियांत्रिकीला नॅक चे 'ए प्लस' हे मानांकन मिळते ही बाब येथील शिक्षणाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या कॅम्पसमधील विविध विभागांची पाहणी केली असता संशोधनासाठी, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि त्यांच्या उज्वल करिअरसाठी जे परिश्रम घेतले जातात, ते खरोखरच अभिमानास्पद आहेत. संशोधन व अभ्यासपूरक वातावरणामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होत आहे.’ असे प्रतिपादन नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या टेक्नॉलॉजी अँड एनर्जी पार्कचे संचालक डॉ. प्रकाश इटनकर यांनी केले. 
       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मान्यवरांनी नुकताच स्वेरीचा अभ्यास दौरा केला. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या टेक्नॉलॉजी अँड एनर्जी पार्कचे संचालक डॉ. प्रकाश इटनकर हे गौरवोद्गार काढत होते. प्रारंभी डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या कामगिरीचा लेखा-जोखा सादर केला तसेच त्यांनी 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन' अर्थात 'ट्रिपल पी इ' ची निर्मिती कशी झाली याबाबत विवेचन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक दर्जा उंचावण्यासाठीचे स्वेरीतील विविध शैक्षणिक उपक्रम, त्यांची कार्यपद्धती, स्वेरीला मिळालेली मानांकने, संशोधनातील गरुड भरारी, विद्यार्थ्यांना करिअरसाठी असलेल्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन वर्ग व यामुळे मिळालेले यश, प्रशासकीय क्षेत्रात स्वेरीचे पडलेले दमदार पाऊल या व अशा महत्वाच्या बाबींची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्वेरी कॅम्पस मधील विविध विभागाबरोबरच ९ अत्याधुनिक प्रयोगशाळा, रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेन्ट फॅसिलिटी, बी.फार्मसी, डी. फार्मसी, क्रीडांगण, इनडोअर स्पोर्ट्स स्टेडीयम, लोडींग फ्रेम, वर्कशॉप, प्लेसमेंट विभाग येथे भेट देऊन तेथे सुरु असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेतला व पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त व आर सेन्स टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा. लि.चे डायरेक्टर प्रा. सूरज रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नॅक’ आणि ‘एनबीए’ च्या दृष्टिकोनातून विकसित केलेल्या 'आर वर्क' या ऑनलाईन इआरपी प्रणालीचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. यासंदर्भात पुढे बोलताना डॉ. इटनकर म्हणाले की, ‘या इआरपी प्रणालीमुळे वापरकर्त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे श्रम व वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात. त्यामुळे कोणत्याही महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी हे सॉफ्टवेअर एक वरदान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’ यावेळी त्यांच्या सोबत लक्ष्मीनारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. भारत भानवसे, तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post