राज ठाकरे मागील काही दिवसांपासून हीप बोन या आजाराने त्रस्त होते. आणि याच संदर्भातील माहिती राज यांनी पुण्यातील त्यांच्या अनेक सभेतून दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज यांच्यावर शास्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर २० जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात राज थाकेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि त्या नंतर पाच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले. याच संदर्भांत माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली होती. ट्विटरच्या पोस्ट मध्ये राज ठाकरे म्हणाले, "आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली! काही वेळेपूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! असं राज ठाकरे पोस्ट मध्ये म्हणाले.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचीही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र ही भेट केवळ राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतली होती असं भाजप कडून स्पष्ट करण्यात आलं.