सकाळी 10.30 च्या सुमारास बसला अपघात झाला आहे. पुलावरून जात असताना अचानक एसटी बस चालकाने नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये 4 जण गंभीर आहे.
अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी 4 जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे.
हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.
